कोंडीवली येथील ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

खेड : तालुक्यातील कोंडीवली बौद्धवाडी येथे झालेल्या अतिक्रमण हटविण्याच्या मुद्द्यावरून प्रशासनाकडून गेली ८ महिने टाळाटाळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेले बसपा पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे साखळी उपोषण चौथ्या दिवशी १८ तारखेला सायंकाळी उशिरा तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी दिलेल्या लेखी आश्वसनानंतर स्थगित करण्यात आले आहे.
खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात चार दिवस सुरू असलेल्या उपोषणामुळे कोंडीवली गावात ग्रामपंचायतीतर्फे अतिक्रमण हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र ते अर्ध्यावरच थांबवल्याचा आरोप आंदोलनकर्ते प्रदीप कांबळे यांनी केला होता. न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर बांधकाम हटविण्याचे काम येथील ग्रामपंचायतीने सुरू केले. मात्र अतिक्रमण पूर्णतः हटवले नाही. दरम्यान ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू ठेवले होते. अतिक्रमण हटवून गावठाण मोकळे करावे या मागणीच्या अनुषंगाने तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button