
फोन लावण्याच्या बहाण्याने एका अज्ञाताने मोबाईल चोरल्याची घटना
फोन लावण्याच्या बहाण्याने एका अज्ञाताने मोबाईल चोरल्याची घटना खेर्डी येथील एम.आय.एफ.टायर गल्ली येथे सोमवारी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात त्या अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या पाठिमागून एक अज्ञात व्यक्ती आली व त्याने अर्जंट फोन लावण्यासाठी मोबाईल मागितला. फिर्यादीने हा मोबाईल दिल्यानंतर फोन लावण्याच्या बहाण्याने त्या अज्ञात चोरट्याने तेथून पळ काढला. हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात येताच त्याने चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com