रत्नागिरी जिल्हा फोटो, व्हीडिओ व्यावसायिकांतर्फे फोटोग्राफी दिन साजरा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फोटो, व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेतर्फे शनिवारी जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला. यानिमित्त एमआयडीसी विश्रामगृहामध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्ष तथा ज्येष्ठ फोटोग्राफर अजय बाष्टे आणि पदाधिकारी, सदस्यांनी कॅमेर्‍याचे पूजन केले. त्यानंतर दिवंगत फोटोग्राफर्सना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
संस्थेतर्फे काही महिन्यांत फोटोग्राफर्ससाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. फोटोग्राफर्सच्या हितासाठी मार्गदर्शन, सेमिनार, कार्यशाळा, प्रदर्शन आदींचे आयोजन करण्याबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली. तसेच दहीहंडीनिमित्त आयोजित छायाचित्र स्पर्धेसंदर्भात चर्चा करण्यात आली. आपली संस्था शासनमान्य असून जिल्ह्यातील छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर्सनी संस्थेत सहभागी व्हावे, असे आवाहन अजय बाष्टे यांनी या वेळी केले. या कार्यक्रमावेळी दहा नवीन फोटोग्राफर्सनी संस्थेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यांचे स्वागत यावेळी करण्यात आले.
यावेळी सुबोध भुवड, संजय देवरुखकर, साईप्रसाद पिलणकर, परेश राजिवले, हर्षल कुलकर्णी, भूषण केळकर, समीर जुवेकर, प्रसाद जोशी, अमित आंबवकर, मंदार वायंगणकर यांच्यासह अनेक फोटोग्राफर्स उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button