निवेंडी भगवतीनगर गणपतीपुळेच्या गोविंदांनी फोडली रत्नागिरीत मनसेची दहीहंडी
रत्नागिरी : मनसेच्या दक्षिण रत्नागिरीची दहीहंडी निवेंडी भगवतीनगर गणपतीपुळे संघाने सहा थर रचून फोडली. ही दहीहंडी फोडणार्या संघाला 36 हजार 999 रुपये रोख पारितोषिक आणि चषक देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमावेळी कोरोनाकाळात उल्लेखनीय कामगिरी करणार्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना गौरवण्यात आले. संपर्क अध्यक्ष मनिष पाथरे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांनी दहीहंडी महोत्सवाच्या आयोजन केले होते. उद्यमनगर येथील चंपक मैदानावर उभारलेली ही हंडी निवेंडी भगवतीनगरर गणपतीपुळे संघाने सहा थर लावून फोडली. रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती.