चिपळुणातील पॉवर हाऊस येथे दहा टायर ट्रकखाली सापडून तरुणाचा जागीच मृत्यू

चिपळूण : शहरातील पॉवर हाऊस येथे मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरू असताना ट्रकखाली सापडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. किरण कृष्णा घाणेकर  (रा. कोंडमळा) असे या तरुणाचे नाव आहे. सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास पॉवर  हाऊस येथे  हा अपघात घडला.  किरण हा लोटे एमआयडीसीमध्ये कामाला होता. आपली ड्युटी संपवून कामथेकडे जात होता. तो पॉवर हाऊस येथे आला असता डाव्या बाजूला रोड रोलरच्या मदतीने खड्डे भरण्याचे काम सुरू होते तर समोरून दहा टायर ट्रक येत होता. याचवेळी   खड्ड्यामुळे अचानक त्याचा तोल गेला आणि ट्रकच्या मागच्या टायरखाली सापडला. दहा टायरचा ट्रक त्याच्या मानेवरून गेल्याने जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. मात्र, अर्धा तासाने उशिरा रुग्णवाहिका दाखल झाली. तत्काळ शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक शिंदे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button