शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पायाशी माझी निष्ठा -आमदार राजन साळवी

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पायाशी माझी निष्ठा आहे.मी त्यांच्याशीच प्रामाणिक आहे आणि अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार, असं वक्तव्य कोकणातील शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केलं आहे.
राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याच्या बातम्या कालपासून येत होत्या. राजन साळवी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचीही चर्चा होती. मात्र मी अशा प्रकारे कोणतीही भेट घेतली नसून माझ्या बाबतीत अशा अफवा पसरवल्याबद्दल दुःख वाटत असल्याची प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली.
आपण शिंदे गटाच्या वाटेवर नाहीत, हे स्पष्ट सांगताना राजन साळवी म्हणाले, कालपासून माझ्यासंदर्भातील बातम्या येत होत्या. गेले ४० वर्ष मी शिवसैनिक म्हणून काम करतोय. शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळेचा आमदार आणि उपनेता म्हणून महाराष्ट्रात काम करतोय. राजकीय घडामोडींमुळे अशी चर्चा असतील. पण माझी निष्ठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या पायाशी आहे. मी प्रामाणिकपणे ठाकरेंसोबत आहे. मी खुलासा करतोय.. मरेपर्यंत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबत काम करणार आहे.आपण शिवसेना सोडणार नाही, असे सांगतानाच राजन साळवी यांनी यापुढे शिवसेनेचा उपनेता म्हणून राज्यभरातील शिवसैनिकांची भेट घेणार असल्याचं सांगितलं
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button