दापोलीत दहीहंडी उत्सवात यंदा शिंदे गटासमोर ठाकरेगट समोरासमोर ठाकले

दापोली -कोकणात आता दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याचा जाहीर कार्यक्रम शुक्रवारी गोपाळकाल्याचे औचित्य साधत रंगणार आहे. यावर्षी लाखो रुपयांच्या बक्षीसांची चढाओढ जिल्हयात चर्चेत राहिलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघात रंगताना पहायला मिळणार आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदासभाई कदम यांचे सुपूत्र आमदार योगेश कदम यांचा हा दापोली हा विधानसभा मतदारसंघ आहे. शिवसेनेच्या कदम गटाची दहीहंडी असते तशी यंदाही आहे पण यंदा प्रथमच ठाकरे गटाबरोबर असलेल्या सूर्यकांत दळवींनीही टस्सल देण्यासाठी दहीहंडी उत्सवात दरवर्षी एक लाख असलेले बक्षीस तीन लाख एकावन्न हजार ठेवले आहे.                                                                  शिवसेनेत नेते रामदासभाई कदम व माजी आमदार सूर्यकांत दळवी या पारंपरिक वादाची किनार असलेला हा दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघ त्यामुळे कोकणात चर्चेत असलेला हा लक्षवेधी मतदारसंघ आहे. दहीहंडी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गट बॅनरबाजीतून वातावरण निर्मितीचा प्रयत्न करण्यात आलाय. आमदार योगेश कदम यांनी तीन लाख तैहतीस हजार तीनशे एकावन्न तर माजी आमदार सूर्यकांत दळवी गटाकडून तब्बल तीन लाख एकावन्न हजार रुपयांचे बक्षीस असलेली दहीहंडी लावण्यात आली आहे. ही दहीहंडी आता कोणते गोविंदा पथकाकडे जाणार याची उत्सुकता अनेकांना आहे                       आमदार योगेश कदम यांनी यापूर्वीही इतक्याच रक्कमेच बक्षीस असलेली दहीहंडी २०१७ सालीही लावली होती त्यापुढील वर्षी दापोलीत सगळे दहीहंडी उत्सव एक बस अपघातात तीस जण मृत्युमुखी पडल्याने सगळे उत्सव रद्द करण्यात आले होते. दोन वर्षे कोरोनामुळे या स्पर्धा झाल्या नाहीत. आता यंदा हा दहीहंडी उत्सव रंगणार आहे. या दोन्ही दहीहंडी उत्सवात मराठमोळ्या लावणी नृत्याचा कार्यक्रम हे खास आकर्षण आहे. योगेश कदम पुरस्कृत दहीहंडी कार्यक्रमात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे यांचा लावण्यांचा कार्यक्रम आहे तर तिकडे ठाकरे गटातही लावण्यांचा कार्यक्रम इतकेच जाहीर करण्यात आल आहे.
                                     राज्यात शिवसेनेत उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर आता कोकणात एकनाथ शिंदे गटाला मोठे बळ मिळाले आहे.त्यामुळे यंदाच्या या खेळात वेगळा ट्विस्ट निर्माण झाला आहे. दापोलीत उद्धव ठाकरे गटाबरोबर असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनीही यंदा प्रथमच मोठया रक्कमेचे बक्षीस असलेली दहीहंडी लावली आहे त्यामुळे दापोलीत गोविंदा पथकांसाठी बक्षीसांची लयलूट आहे. वेगवेगळ्या थराला सहभागी गोविंदा पथक लावेल त्या थरानुसार बक्षीस ठेवण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button