कोंडीवली बौद्धवाडी येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरूच
खेड : तालुक्यातील कोंडीवली बौद्धवाडी येथे झालेल्या अतिक्रमण हटविण्याच्या मुद्यावरून स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेले बसपा पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे साखळी उपोषण चौथ्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते. या उपोषणामुळे कोंडीवली गावात ग्रामपांयतीतर्फे अतिक्रमण हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, ते अर्ध्यावरच थांबवल्याचा आरोप आंदोलनकर्ते प्रदीप कांबळे यांनी केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार गट क्रं. 117 मधील बांधकाम हटविण्याचे आदेश येथील ग्रा. पं. ला देण्यात आले. त्यानुसार जेसीबीद्वारे अतिक्रमण केलेले बांधकाम पोलीस बंदोबस्तामध्ये हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, हेे काम पूर्णतः निष्कासित केले नसल्याचे प्रदीप कांबळे यांनी
सांगितले.