
उमराठ गावात विधवा महिलेला ध्वजारोहणाचा मान
गुहागर : उमराठ गावात विधवा महिलेला ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. जयश्री गावणंग यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. सुरूवातीला जयश्री गावणंग यांना ग्रामपंचायत उमराठच्यावतीने प्रियांका कीर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यानंतर सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या उपस्थितीत तिरंगा फडकविण्यात आला. यापूर्वीच ग्रामपंचायत उमराठने विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय घेऊन विधवा महिलांना मान-सन्मान मिळवून दिला आहे. यावेळी ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे, उपसरपंच सूरज घाडे, सदस्या साधना गावणंग, समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वसंत कदम, संदीप गोरिवले, ग्रामस्थ, मुख्याध्यापक प्रदीप रामाणे, ग्रा.पं. कर्मचारी नितीन गावणंग व प्रशांत कदम उपस्थित होते.