प्राईम डायग्नॉस्टिक्सतर्फे एसटी महामंडळातील कर्मचार्यांची आरोग्य तपासणी
रत्नागिरी : रत्नागिरी येथील प्राईम डायग्नॉस्टिक्सच्या वतीने एस.टी. महामंडळातील चालक, वाहक, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 85 जणांची मोफत ब्लड शुगर तपासणी करण्यात आली. एसटी महामंडळातील चालक, वाहक नेहमीच जनतेला सेवा देण्याचे काम करत असतात. ही सेवा बजावताना त्यांना आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने प्राईम डायग्नॉस्टिक्सच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरीतील माळनाका येथील एसटी आगारात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होत. वात्सल्यसिंधू सेवाभावी संस्थेतर्फे कर्मचार्यांसाठी कोव्हिड डोस शिबिर आयोजित केले गेले. यावेळी प्राईम डायग्नॉस्टिक्स सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. तरन्नूम खलिफे, प्रशासक समीक्षा बने, वात्सल्यसिंधू सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध खामकर, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, आगार व्यवस्थापक रमाकांत शिंदे, महेंद्र तोडणकर, प्रसाद मोहिते वैद्यकीय अधिकारी, उपस्थित होत्या.