
साडवलीत राज्यस्तरीय नांगरणी, भातलावणी स्पर्धा
देवरूख ः नजीकच्या साडवली येथील युवा सेनेच्यावतीने 21 रोजी राज्यस्तरीय नांगरणी व भातलावणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. साडवली येथील जाधववाडी येथे स्पर्धा रंगणार आहेत. यात घाटी बैल जोडी व गावठी बैल जोडी अशी दोन गटात स्पर्धा रंगणार आहे. घाटी गटातील प्रथम क्रमांकास 7 हजार रुपये व चषक, द्वितीयास 5 हजार व चषक, तृतीय क्रमांक 4 हजार व चषक, चतुर्थ क्रमांक 3 हजार व चषक तर पाचवा क्रमांकास 2 हजार रुपये व चषक दिला जाणार आहे. गावठी गटात प्रथम क्रमांक 5 हजार, द्वितीय 4 हजार, तृतीय 3 हजार, चौथा 2 हजार व पाचवा क्रमांकास 1 हजार रुपये व सर्वांना चषक दिला जाणार आहे. स्पर्धेच्या दिवशी सकाळी 9 वा पर्यंत नाव नोंदणी करावी. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन युवासेनेने केले आहे.