व्हॉलिबॉल स्पर्धेत सीमा शुल्क विभाग विजयी

रत्नागिरी ः कारवांचीवाडी पोलीस वसाहत, रत्नागिरी येथे  जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत एकूण 15 संघांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रथम क्रमांक सीमा शुल्क विभाग, द्वितीय क्रमांक काळबादेवी, रत्नागिरी ग्रामीण, तृतीय क्रमांक  महालक्ष्मी कुवारबांव रत्नागिरी यांनी पटकावला. सागरी किनारी भागात सुरक्षेचे महत्त्व व जनजागृती व्हावी तसेच लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीकोनातून पोलीस ठाणे स्तरावर, उपविभागीय स्तरावर तसेच जिल्हास्तरावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम व मैदानी खेळ घेऊन ‘मिशन सागर’ उपक्रम पोलीस दलाच्यावतीने पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.
विजेत्या संघांना स्वातंत्र्यदिनी उद्योगमंत्री उदय सामंत, यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटिल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button