टेरवचे सुपुत्र संजित कदम यांना दुसर्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर
चिपळूण : तालुक्यातील टेरव गावचे सुपुत्र संजित कदम यांना दुसर्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. टेरव येथील संजित रघुनाथ कदम हे कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात सुभेदार म्हणून कार्यरत आहेत. पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती सुधार सेवा पदक जाहीर झाले आहे. तसेच यापूर्वी 2015 मध्ये उत्कृष्ट व प्रशंसनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मान झाला होता. या शिवाय 1 मे 2022 रोजी पोलिस महासंचालक पदक देऊन त्यांचा सन्मान झाला होता. संजित कदम हे 1992 मध्ये येरवडा कारागृहात शासकीय सेवेत रुजू झाले. उत्कृष्ट कबड्डीपटू, व्हॉलिबॉलपटू असून त्यांनी अनेकवेळा कारागृहाच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.