
जिंदल गॅस टर्मिनल प्रकल्प विरोधी आंदोलनासाठी बच्चू कडू २८ रोजी रत्नागिरीत.
जिंदल गॅस टर्मिनल प्रकल्प लोकवस्तीतून निर्मनुष्य ठिकाणी स्थलांतर व्हावे व आपण महाभयानक संकटातून कायम मुक्त व्हावे यासाठी २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार्या बेमुदत आंदोलनासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू रत्नागिरीत उपस्थित राहणार आहेत.जयगड-नांदिवडे येथील गॅस टर्मिनलची नियोजित जागा वस्तीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. या गॅस टर्मिनल संदर्भात कोणताही मोठा अपघात घडल्यास परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे परिसर धोकादायक ठरणारे हे गॅस टर्मिनल भर गावात नको, या मागणीसाठी बुधवारी ग्रामस्थांसह बेमुदत आंदोलनाला माजी आमदार बच्चू कडू उपस्थित राहणार असल्याचे संघर्ष समितीकडून सांगण्यात येत आहे.www.konkantoday.com