
‘फिनोलेक्स’च्या 14 विद्यार्थ्यांची नामवंत कंपनीमध्ये निवड
रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मास्टर ऑफ कॉम्पुटर अॅप्लिकेशन या विभागातील 14 विद्यार्थ्यांची बेंचमार्क आयटी सोल्युशन, पुणे कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. हा कॅम्पस ड्राईव्ह दि. 8 ऑगस्ट व 9 ऑगस्ट रोजी फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये घेण्यात आला.
या मुलाखतीसाठी बेंचमार्क कंपनीमार्फत समीर आठल्ये, मंगेश वाघ, सचिन सुर्वे हे तज्ज्ञ उपस्थित होते. फिनोलेक्सच्या अथर्व खेर, झुबेर काझी, प्रीती पालांडे, तुषार वेदपाठक, ऋषिकेश पारुंडेकर, अक्षय वैद्य, प्रथमेश झोरे, सिद्धी रसाळ, विश्वम सावंत, सरीन राजेंद्रन, कमलेश झिकामाडे, आशिष घवाळी, सिमरन बोदले, फिझा कापडी यांची निवड झाली आहे. एम. सी. ए. चे शिक्षण पूर्ण होण्याअगोदरच नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 6 लाखांचे पॅकेज देण्यात आले आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने यासाठी सहकार्य केले. याबद्दल अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.