
हर घर तिरंगा : शिरगावच्या विद्यार्थिनींनी दिली जिल्हाधिकार्यांना शुभेच्छापत्रे
रत्नागिरी : शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए कॉलेजमधील विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना शुभेच्छापत्र आणि भारताच्या नकाशाची प्रतिकृती भेट म्हणून दिली. या अनोख्या उपक्रमाबाबत जिल्हाधिकार्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सायकल रॅली, तिरंगा फेरी, पदयात्रा, स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शिरगाव येथील बी.सी. ए. कॉलेजमध्ये विद्यार्थिनींनी हस्तकौशल्यातून शुभेच्छापत्र साकारली आहेत. पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह समाजातील विविध प्रतिष्ठित मान्यवरांना अशी शुभेच्छापत्र वितरित करण्यात येणार आहेत. विद्यार्थिनी सलोनी वरेकर, सानिका सावंत, सुरभी सावंत, दिया चव्हाण, प्रीती साळवी, ज्ञानदा केळकर, मंजिरी कांबळे आणि प्रा. केतन पाथरे यांनी जिल्हाधिकार्यांना भारतीय स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देणारे व शहीद भगतसिंग यांचा संदेश असणारे शुभेच्छापत्र दिले. तसेच भारताची सुरेख प्रतिकृती भेट म्हणून
दिली. या नंतर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी विद्यार्थिनींनी शुभेच्छा देत शिक्षणाविषयी माहिती घेतली. कॉलेज शिक्षण घेणार्या या विद्यार्थिनींनी आपल्या जिल्ह्यासाठी योगदान द्यावे, अशी सूचनाही त्यांनी
केली.