
भारती शिपयार्ड कंपनीच्या गोडावूनमधून चोऱ्या करणारी टोळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पकडली, पावणेसात लाख रुपयांचा ऐवज हस्तगत
भारती शिपयार्ड कंपनीच्या बंदिस्त गोडावूनमधून काही दिवसांपूर्वी पावणे दोन लाखांचे साहित्य चोरल्याची तक्रार कंपनीच्या वतीने करण्यात आली होती. हा गुन्हा ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल झाला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांनी एक पथक तयार करून शहरातील व परिसरातील भंगार खरेदी करणाऱ्यांवर नजर ठेवली होती .तसेच हा माल कोल्हापूर येथे विकला जाण्याची शक्यता असल्याने येथेही लक्ष ठेवण्यात आले होते. दरम्यान खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिऱया बंदर येथील राहणारे रुपेश सावंत व शिवराय कुंभार यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या त्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले सुरुवातीला त्यांनी उडवाउवीची उत्तरे दिली स्वतंत्र चौकशी केल्यावर त्यानी गुन्हा कबूल केला चोरीतील कार्पेट एका खोलीत मिळून आले. तांब्याचे पाईप माजगावातील भंगारवाला प्रकाश गोसावी याला विकल्याचे त्यानी सांगितले.आरोपीने कार्पेट ठेवलेल्या खाेलीची पोलिसांनी तपासणी केली असता या ठिकाणी इलेक्ट्रिक कंट्रोल केबल ,फायर सूट ,कंट्रोल बॉक्स, हेडसेट असे जहाज बांधणीसाठी लागणारे पावणे सात लाख रुपये किमतीचे सामान मिळून आले तसेच कोल्हापूर येथे विकण्यात आलेले सतरा हजार रुपये किमतीचे पाइपही जप्त करण्यात आले .या प्रकरणी आरोपी रुपेश सावंत, शिवराय कुंभार, प्रकाश गोसावी यांना अटक करण्यात आली आहे .
पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे ,अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष माने, तानाजी मोरे ,पांडुरंग गोरे ,पोलीस कॉन्स्टेबल संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, राजेश भुजबळराव ,शांताराम झोरे ,सुभाष भागणे, मिलिंद कदम ,संजय जाधव, राकेश बागुल, प्रशांत बोरकर,नितीन डोमणे ,अरुण चाळके, विजय आंबेकर, सागर साळवी, उत्तम सासवे, अमोल भोसले, दत्ता कांबळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
www.konkantoday.com