मुंबई-गोवा महामार्ग अंतर्गत सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेवरून चिपळुणात राष्ट्रवादी आक्रमक

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत करण्यात आलेल्या सर्व्हीस रोडच्या बिकट अवस्थेवरून आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीने शुक्रवारी (दि.12) रोजी माजी आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर धडक दिली. येत्या आठ दिवसांत महामार्गावरील सर्व्हीस रोडची दुरूस्ती न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकून अधिकारी व ठेकेदारांना खड्ड्यांत नेऊन बसवावे लागेल, असा इशारा दिला. यावेळी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, माजी सभापती शौकत मुकादम, माजी पं. स. सदस्य नितीन ठसाळे, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, किशोर रेडीज, आदिती देशपांडे, रुक्सार अलवी, मुराद अडरेकर, हिंदुराव पवार, खालीद दाभोळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महामार्ग कार्यालयातील अधिकार्‍यांना धारेवर धरले. माजी आ. रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी सकाळी 11:30 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button