भविष्यातील सत्तेत कोणाला बसवायचे याचा विचार करून मतदान करा : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे देवरूख येथे प्रतिपादन

देवरूख : आपला देश तरुणांचा देश आहे. भविष्यातील सत्ता व सत्तेत कोणाला बसवायचे हे मतदार ठरवणार आहेत. यासाठी युवा मतदारांनी आगामी निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी देवरूख येथील कार्यक्रमात केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ प्रवास अभियानांतर्गत नामदार मिश्रा शुक्रवारी देवरूख येथे आले होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद जवान स्मारकाला भेट दिली. शहीद जवानांना मानवंदना दिली.
माटे-भोजने येथील सभागृहात नवमतदारांशी ना. मिश्रा यांनी संवाद साधला. प्राचीन इतिहासाचा अभ्यास करा. संस्कृतीची जपणूक करा. तरच पूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल. संपूर्ण जगच आदराने ‘भारत माता की जय’ म्हणेल, असा विश्वास ना. मिश्रा यांनी व्यक्त केला. यावेळी जवानांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय खो-खो पटू पल्लवी सनगले व यशश्री सनगले, लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड केल्याबद्दल विलास रहाटे व प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांचाही सन्मान ना. मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शैलेंद्र दळवी, राजन तेली, भाजपा जिल्हा अध्यक्ष दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव, सदानंद भागवत, रश्मी कदम, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, तहसीलदार सुहास थोरात, मुख्याधिकारी चेतन विसपुते मुकुंद जोशी, स्वाती राजवाडे आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी व नवमतदार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता प्रा. संदीप मुळ्ये यांनी केली. सूत्रसंचालन सुशांत मुळ्ये तर आभार डॉ. अमित ताठरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button