
धाऊलवल्ली येथे रानभाजी महोत्सव
राजापूर : कृषी विभाग राजापूर व कृषी तंत्रज्ञान (आत्मा) यांचा संयुक्त विद्यमानाने राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथील गोखले महाविद्यालयात येथे रानभाजी महोत्सव 2022 चे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कृषी उप संचालक चिखले, उप विभागीय अधिकारी कृषी नाईक नवरे, तालुका कृषी अधिकारी गावित, कृषी विभागाचे अध्यक्ष विलास गुरव, मा. विभागप्रमुख डॉ.सुनील राणे, सभापती प्रकाश गुरव, धाउलवल्ली सरपंच मनोहर गुरव, राजापूर तालुका उमेदच्या समन्वयक सौ.वायंगणकर, विभाग समन्वयक मनाली करंजवकर व मान्यवर उपस्थित होते.