
बुरंबी-तेरेवाडी येथील प्रौढाचा सर्प दंशाने उपचारादरम्यान मृत्यू
संगमेश्वर : तालुक्यातील बुरंबी-तेरेवाडी येथील प्रौढाचा सर्प दंशाने उपचारादरम्यान येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मोहन यशवंत निकम (वय ५४, रा. बुंरबी-तेरेवाडी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवार ११ ऑगस्ट रोजी दुपारी 1 वा.सुमारास घडली. मोहन निकम यांच्या पायाला बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास फुरसे चावले. त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु गुरुवारी त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची खबर त्यांचा मुलगा संजय निकम यांनी पोलिसांना दिली.




