केंद्रीय मंत्री नारायण राणे शुक्रवारी रत्नागिरी जिल्हा दौर्यावर
रत्नागिरी : केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे जिल्हा दौर्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार 12 ऑगस्ट रोजी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे येणार आहेत. 9.30 वाजता रत्नागिरी विशेष कारागृह येथे आगमन. सकाळी 9.30 ते 10.30 वाजता हर घर तिरंगा कार्यक्रमास उपस्थिती. 10.45 वाजता लोकमान्य टिळक जन्मस्थान येथे आगमन. सकाळी 10.45 ते दुपारी 12 वाजता वाजता हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम. दुपारी 12 ते 3.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सायंकाळी 4.20 वाजता रत्नागिरी रेल्वेस्थानक येथून तेजस एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत, असे कळवण्यात आले आहे.