रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२२’ मध्ये ‘पालवी’ या मराठी लघुपटाने सर्वोत्कृष्ट संदेश लघुपटाचा पुरस्कार पटकावला
५९ देशांमधून सादर केलेल्या १२५० हून अधिक लघुपटांपैकी ‘रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२२’ मध्ये ‘पालवी’ या मराठी लघुपटाने सर्वोत्कृष्ट संदेश लघुपटाचा पुरस्कार पटकावला. फिल्म एज्युकेशन अँड वेलफेअर फाऊंडेशन औरंगाबादतर्फे मौलाना आझाद संशोधन केंद्र आणि सभागृह, औरंगाबाद, महाराष्ट्र येथे निवडक चित्रपटांचे प्रदर्शन आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. साहिल खालिद दलवाई निर्मित आणि सालम अख्तर दलवाई लिखित-दिग्दर्शित पालवी या लघुपटाचे चित्रीकरण चिपळूण तालुक्यातील मिरजोळी गावामध्ये झाले. पालवी लघुपट १४ जून २०२२ रोजी यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे.
www.konkantoday.com