
मातृमंदिर देवरूख आयोजित दीपकाडी महोत्सवात रत्नागिरी उप परिसर एनएसएस स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना करून दिली सड्यांची ओळख
मातृ मंदिर देवरूख आयोजित दीपकाडी महोत्सव शुक्रवार दिनांक 05 ऑगस्ट 2022 रोजी संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. बी. एन. पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.कोकणात आढळणारी प्रदेशनिष्ठ दीपकाडीचे तसेच इतर वनस्पती यांचे परिसंस्थेमधील महत्त्व व सड्यांचे महत्त्व लोकांना अवगत करण्याच्या हेतूने आयोजित या महोत्सवात रत्नागिरी उप परिसर एनएसएस विभागाच्या स्वयंसेवक सहभागी झाले होते. सुरुवातीला वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक डॉ. नाईकवडे, सडे अभ्यासक श्री प्रतीक मोरे तसेच वनस्पती तज्ञ मार्गदर्शक डॉ. मिरगल सर यांनी सर्व वनस्पती व सड्यांची माहिती कशी देता येईल या बद्दल स्वयंसेवकांना ट्रेनिंग दिले. उद्घाटनानंतर रत्नागिरी उपपरिसर एनएसएस स्वयंसेवकांनी महोत्सवास भेट देणाऱ्या शाळा महविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना दिपकाडी तसेच कातळवरील इतर वनस्पती ,त्यांचा जीवनक्रम, परिसंस्थेत असणारे त्यांचे महत्त्व व सड्यांच्या संवर्धनाची गरज या बाबत माहिती दिली.सदर महोत्सवास रत्नागिरी उपपरिसर प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
www.konkantoday.com
