भाट्ये येथे दुचाकी अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा
रत्नागिरी : बेदरकारपणे कार चालवून समोरुन येणार्या दुचाकीला धडक देत अपघात केला. या प्रकरणी कार चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना सोमवार दुपारी 12.45 वा.भाट्ये झरीविनायक मंदिराजवळ घडली होती. संजय सीताराम तांबे (52, रा. कारवांचीवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात श्रेया श्रीधर लिंगायत (35,रा.फणसोप सडा, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.