चांदसूर्या येथून दुचाकी लांबवणाऱ्याला 4 महिन्यांचा साधा कारावास

रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी चांदसूर्या येथून साडे तीन महिन्यांपूर्वी दुचाकी लांबवणार्‍या संशयिताला न्यायालयाने सोमवारी 4 महिन्यांचा साधा कारावास सुनावला.
पवनकुमार उदय सिंह (वय 24, रा.पंचकुला हरियाणा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत हेमंत तानाजी मांडवकर (वय 45, रा. पानवल घवाळीवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, मांडवकर यांचे चांदसुर्या येथे वडापाव सेंटर आहे.त्याठिकाणी त्यांनी 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6 वा.आपली ऍक्सेस दुचाकी (एमएच-08-एई-3196) वडापाव सेंटर समोर दुचाकीला चावी लावूनच उभी करुन सेंटरची साफसफाई करण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञाताने त्यांची दुचाकी लांबवली होती. याप्रकरणी मांडवकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिस हेड काँस्टेबल एस.बी.कांबळे याचा तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी पवनला 15 एप्रिल रोजी अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.न्यायालयाने त्याला 15 ते 18 एप्रिल 2022 पर्यंत पोलिस कोठडी सुनावून न्यायालयीन कोेठडी सुनावली होती. सोमवारी या खटल्याचा निकाल देताना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी संगीता वनकोरे यांनी पवनला चार महिन्यांचा साधा कारावास सुनावला. सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले असून सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड काँस्टेबल दुर्वास मोरे, संजीवनी मोरे आणि पोलिस हवालदार सुनिल आयरे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button