
घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. प्रतिक ओक यांना सर्व्हिकल कॅन्सर निदानावरील संशोधनासाठी पेटंट
खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जीआयटी) मधील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रतिक ओक यांना सर्व्हिकल कॅन्सरच्या लवकर निदान व पूर्वानुमानावर आधारित संशोधनासाठी पेटंट मिळाले असून, संस्थेच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील कर्तृत्वात एक नवीन मुकुटमणी जोडला गेला आहे.
डॉ. प्रतिक ओक यांच्या पेटंटेड संशोधन प्रणालीमध्ये विविध वैद्यकीय डेटा मॉडॅलिटीजचे एकत्रीकरण आणि प्रगत मशिन लर्निंग मॉडेल्सचा उपयोग करण्यात आला आहे. यामुळे सर्व्हिकल कॅन्सरची प्रगती, त्याचे लवकर चिन्हे आणि उपचार नियोजनाबाबत अधिक अचूक, विश्वसनीय आणि वेळेवर माहिती मिळण्यास मदत होणार आहे. महिलांमध्ये भारतासह जगभरात आढळणार्या या गंभीर आजाराविरुद्ध तंत्रज्ञानाच्या
साहाय्याने लढण्याचा हा प्रभावी मार्ग ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त कली जात आहे. या यशाबद्दल संस्थेच्या व्यवस्थापनाने व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी डॉ. ओक यांचे अभिनंदन केले आहे. ही कामगिरी जीआयटीसाठी अभिमानास्पद असून, तरुण संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.www.konkantoday.com




