गुहागर तालुक्यात मुसळधार पावसाने शाळा, गोठ्याचे नुकसान

गुहागर : तालुक्यात तीन दिवस मुसळधार पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. साखरीआगर येथे घराची पडवी, कुडली येथे शाळेची भिंत, कोतळूक येथे गोठा पूर्णत: कोसळून नुकसान झाले आहे.
गुहागर तालुक्यात बुधवारी सरासरी 80.4 मि.मी. इतका पाऊस पडल्याची माहिती गुहागर आपत्ती विभागाकडून प्राप्त झाली आहे. मंगळवारी पावसाचा जोर अधिक वाढून वादळी वारे देखील वाहत होते. एकूणच तीन दिवस मुसळधार कोसणार्‍या पावसाने साखरीआगर येथे घरावर झाड पडुन नुकसान झाले. कुडली नं.3 माटलवाडी शाळेची अर्धी भिंत कोसळली.
कोतळूक येथील पार्वती कावणकर यांचा गोठा पूर्णपणे कोसळला आहे.तर लक्ष्मी गोरीवले यांच्या घराची पडवी पूर्णपणे कोसळली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button