
’हर घर तिरंगा’ अभियानात रत्नागिरीतील सर्व सुवर्णकार सहभागी होणार
रत्नागिरी : आजादी के 75 साल’च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ’हर घर तिरंगा’ अभियानात रत्नागिरीतील सर्व सुवर्णकार सहभागी होणार असल्याचे रत्नागिरी सराफ सुवर्णकार संघटनेने जाहीर केले आहे.
जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’अंतर्गत सर्व आस्थापना, व्यावसायिक, नागरिक, कार्यालयांना 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत झेंडा फडकविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याला सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत असून, नागरिकांमधून दिवसेंदिवस उत्साह वाढत आहे. रत्नागिरी सराफ सुवर्णकार संघटनेनेही यात सहभागी होण्यास पाठिंबा दर्शविला असल्याचे अध्यक्ष संतोष खेडेकर यांनी जाहीर केले आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले कर्मचारी, ग्राहक यांनाही तिरंगा ध्वज द्यावा, जेणेकरून ते आपल्या घरी हा तिरंगा ध्वज आनंदाने फडकवतील, असे आवाहन संघटनेने केले आहे.