महाडपेक्षा पोलादपूर तालुक्यात पाऊस जास्त

पोलादपूर : दि. 7 ऑगस्ट रोजी महाड तालुक्यात 89 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली असून पोलादपूर तालुक्यात 113 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद दिसून येत आहे. दुसऱ्याच दिवशी दि. 8 ऑगस्ट रोजी महाड आणि पोलादपूर या दोन्ही तालुक्यांमध्ये 124 मि.मी. पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये पडलेल्या पावसाची टक्केवारी पोलादपूर तालुक्यात 61.97 तर महाडची टक्केवारी 59.17 असल्याचे आकडेवारी सांगत आहे. यावरून महाड तालुक्याच्या तुलनेमध्ये पोलादपूर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. पोलादपूर तालुक्यात मंगळवार, दि. 9 ऑगस्ट 2022 रोजीही मुसळधार पाऊस पडत असताना अधूनमधून विश्रांतीही घेतल्याने कोठेही पूरस्थिती उदभवली नसल्याचे दिसून आले. पोलादपूर तालुक्याला कोकणातील ऑरेंज अर्लट लागू असल्याने प्रशासन सज्ज आणि सतर्कता बाळगून असल्याचे या पार्श्वभूमीवर दिसून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button