
ज्ञानदीप भडगावचे 22 विद्यार्थी जेईई परीक्षेसाठी पात्र
खेड : तालुक्यातील भडगाव येथील कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिर उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील सुयश अनिल पाटील (99.13) मिळवून जेईई परीक्षेत प्रशालेत प्रथम आला आहे. तसेच यशश्री माने (97.53) द्वितीय, अथर्व यादव (97.24) तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
विद्यालयातील आदित्य भोसले (95.15) , साहिल घाटगे (94.66) , तेजस पोकळे (93.70) , दुर्वा तोडकरी(93.66) , यशिता जाधव (91.88) आठवी, सान्वी पाटणे (91.75), दिग्विजय माणगांवकर(90.86) , समर बैकर (90.85) यांनी यश मिळविले आहे. राज दीपक माळवे , यश मंगेश सुर्वे, साहिल रमेश मनवे , प्रणव प्रकाश जोयशी , नारायण चंद्रकांत गीते , जयेश संदेश राऊत , हर्षल गणपत सावर्डेकर , पीयूष प्रवीण वाघेला , शुभम वसंत कांबळे , पार्थ रविंद्र खेडेकर व अनुराग संतोष घोडेराव अशा एकूण 22 विद्यार्थ्यांनी JEE Mains परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. हे विद्यार्थी पुढील JEE Advanced परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
या विद्यार्थ्यांना प्रशालेतील मार्गदर्शक शिक्षक विठ्ठल सकुंडे, कांतिनाथ शिंदे, पंकज हालके, मकरंद दाबके, अभिजीत शेळके, अश्विनी पाटील, समीर सेठी, विशाल कोळेकर, सूर्या मोहन सिंग यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.