कोंकणकन्या “शमिका भिडे” बनली पुण्याची सुनबाई!

“झी-सारेगमप”मधून प्रकाशझोतात येऊन सुमधुर स्वरांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारी “कोंकणकन्या” शमिका भिडे पुण्याची सुनबाई झाली आहे. संगीत विश्वातच कार्यरत असलेल्या गौरव कोरगावकर याच्याशी शमिकाचा 6 डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे तिच्या माहेरगावी विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला.झी-सारेगमपच्या लिटिल चॅम्पमधील सुरेल रत्नांतील विवाहबद्ध होणारी शमिका बहुधा पहिली आहे. शमीकाच्या विवाह सोहळ्याला संगीतक्षेत्रासह अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली.
सौभाग्यवती होण्याची पहिली पायरी म्हणजे शमिका व गौरवचा साखरपुडा 9 मे 2019 रोजी रत्नागिरीमध्ये झाला होता आणि लग्नसोहळाही रत्नागिरीत दिमाखात संपन्न झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button