
साखरपा-देवरूख मार्गावर बिबट्याने केला शिक्षकाचा पाठलाग
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा- देवरूख मार्गावर सध्या बिबट्याची दहशत पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळची शाळा असल्याने मंगेश बुधाजी घागरे हे शिक्षक आपल्या दुचाकीने साखरपा ते मोर्डे असे जात होते. यावेळी मोर्डे खिंडीजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने मंगेश घागरे यांच्या दुचाकीचा पाठलाग केला. दैव बलवत्तर म्हणून घागरे यांचे प्राण वाचले. याआधी देखील या परिसरात बिबट्याने गुरे फस्त केली आहेत. त्यामुळे वनखात्याने पिंजरा लावण्याची विनंती ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.