रत्नागिरीतील काँक्रीटीकरण रस्त्यांसाठी १०० कोटींना मान्यता : आमदार उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
रत्नागिरी : नगर परिषद विकास कामांसाठी पहिल्या टप्प्यात सुमारे २० कोटी रुपये निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केले आहेत. दुसऱ्या टप्प्यात ४० कोटी इतर विकास कामांसाठी निधीला तत्त्वतः मान्यता मिळणार आहे, अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आ. सामंत म्हणाले, रत्नागिरीतील काँक्रीटीकरण रस्त्यांसाठी १०० कोटींना मान्यता मिळाली आहे.
२८ जुलैला नगर परिषद विकास कामाचे परिपत्रक काढण्यात आले. ४ कोटी ७८ लाख व १५ कोटी २२ लाख असा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे, असे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आ. सामंत यांनी सांगितले.