खडी कोळवणमधील बेपत्ता वृध्दाचा मृतदेह सापडला कुजलेल्या अवस्थेत

संगमेश्वर : तालुक्यातील खडीकोळवण खाडेवाडीतील बेपत्ता झालेल्या ८७ वर्षीय वृद्धाचा मृतदेह शुक्रवारी मिळून आल्याची माहिती देवरुख पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे. सोनू तानू खाडे असे मृत वृध्दाचे नाव आहे. याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याबतची खबर शेवंती सोनू खाडे यांनी दिली आहे. सोनू खाडे यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता. शेवंती व सोनू खाडे हे १६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता काजू व सागाची झाडे पाहण्यासाठी गेले होते. जंगलमय भागात गेल्यावर सोनू हे अचानक दिसेनाशे झाले. मात्र ते परत आले नव्हते. यादरम्यान नातेवाईकांनी शोधाशोध केली. परंतु ते मिळून न आल्याने बेपत्ता असल्याची फिर्याद देवरुख पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. याचदरम्यान ५ ऑगस्ट रोजी गावातील पांडुरंग शिवा घोलम हे खेकडे पकडण्यासाठी शाळेची वहाळ याठिकाणी गेले असता, तेथील खडकावर त्यांना कपडे दिसून आले. ही बाब त्यांनी ग्रामस्थांना सांगून परिसराची पाहणी केली. याच दरम्यान एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. शेवंती यांना हे कपडे दाखविल्यानंतर त्यांनी हे कपडे आपल्या पतीचेच असल्याचे ओळखले. त्यानुसार हा मृतदेह सोनू खाडे यांचाच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. याबाबतची माहिती देवरुख पोलिसांना देण्यात आल्यावर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button