
लांजा कोत्रेवाडी येथे वस्तीलगत डंपिंग प्रकल्प राबविण्यास आमचा ठाम विरोध-कोत्रेवाडी ग्रामस्थ
डंपिंग ग्राउंडच्या माध्यमातून आम्हाला देशोधडीला लावण्यासाठी नगर पंचायत प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना कितीही प्रयत्न करू दे, मात्र लांजा कोत्रेवाडी येथे वस्तीलगत डंपिंग प्रकल्प राबविण्यास आमचा विरोध ठाम आहे. भले मग त्यासाठी आमरण ऊपोषण करण्यास भाग पडले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका कोत्रेवाडी ग्रामस्थांनी घेतली आहे.
दोन दिवसांपुर्वी लांजा येथे पार पडलेल्या शिवसेना लोक प्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवकांच्या बैठकीत कोत्रेवाडी येथेच डंपिंग ग्राऊंड प्रकल्प राबविण्याचे निश्तित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की, लांजा कोत्रेवाडी येथे प्रस्तावित असलेल्या डंपिंग ग्राउंड प्रकल्पाला येथील ग्रामस्थांचा विरोध आहे.
www.konkantoday.com