राज्यपाल कोश्यारींना राष्ट्रवादी पाठवणार निषेधाची पोस्टकार्ड
चिपळूण : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्रविरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ पोस्टकार्ड पाठविले जाणार आहेत. या उपक्रमाला चिपळूण तालुक्यातून मोठा प्रतिसाद लाभत असून जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष योगेश शिर्के यांच्या पुढाकाराने युवक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी ही मोहीम राबवित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून पंधरा हजार पत्र पाठविण्याचा संकल्प राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला आहे. चिपळूणमध्ये युवक राष्ट्रवादीचा याला मोठा प्रतिसाद लाभला असून जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, शिरीष काटकर, अविनाश केळसकर, युवती राष्ट्रवादीच्या पदाधिकारी जान्हवी फोडकर, रंजिता ओतारी, पदाधिकारी व कार्यकर्ते, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाल्या असून, चिपळुणातून मोठ्या प्रमाणात पोस्ट कार्ड पोस्टपेटीत टाकण्यात आले.