
रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिर परिसरातून दुचाकीची चोरी
रत्नागिरी : विठ्ठल मंदिर परिसरातून अॅक्सेस दुचाकी लांबवल्याची घटना गुरुवार 7 जुलै रोजी दुपारी 3.30 नंतर घडली आहे. 15 हजार रुपये किमतीची ही दुचाकी होती. याबाबत प्रवीण मोतीराम श्रीनाथ (वय 48, रा.रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचा मुलगा अभय हा क्लाससाठी विठ्ठल मंदिर परिसरात एक्सेस (एमएच-08-वाय -2062) दुचाकी घेऊन गेला होता. क्लास सुटल्यानंतर तो दुचाकी घेण्यासाठी गेला असता त्याला दुचाकी दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.