मंडणगडचे तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार

मंडणगड : महसूल दिनाच्या निमित्ताने 1 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आयोजित कार्यक्रमात मंडणगडचे तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याहस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांनी मंडणगड तालुक्यात दोन वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळ या नैसर्गिक संकटात उत्तम कामगिरी बजावली होती. यावेळी त्यांनी व त्यांच्यासमवेत असलेले तत्कालीन तहसीलदार यांनी हवामान खात्याच्या रिपोर्टनंतर वेळास येथील नागरिकांना आदल्याच दिवशी स्थलांतरित करण्याच्या सूचना देत नागरिकांना किल्लेवाडी येथे स्थलांतरित केले होते. त्यावेळी उद्भवलेल्या भीषण चक्रीवादळात नागरिकांची जीवितहानी टळली होती. तोक्ते वादळातही त्यांची कामगिरी उल्लखनीय होती. कोरोना महामारीत चांगले काम केले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी महसूल दिनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला आहे. यावेळी कार्यक्रमात जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड आदी मान्यवर उपस्थित होते.
याचबरोबर मंडणगड येथील तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी प्रवीण मोरे, कार्यालयीन सेवक शैलेश सापटे यांनाही गौरवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button