कोट्यवधी रुपयांचा अपहार झालेल्या ओंकार ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेच्या व्यवस्थापिका निर्दोष; तीन कर्मचारी व 12 संचालक दोषी

देवरूख : शहरातील कोट्यवधी रुपयांचा अपहार झालेल्या ओंकार ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेच्या या प्रकरणाचा निकाल प्राधिकरण चौकशी अधिकारी यांनी दिला असून व्यवस्थापिकेची
निर्दोष मुक्तता केली आहे. तीन कर्मचारी व 12 संचालकांना दोषी ठरवले आहे. यात त्यांनी अपहारित रक्कम 45 दिवसात संस्थेत भरणा करावयाची आहे.
संस्थेच्या तत्कालीन संचालकांनी संस्थेतील 3 कोटी 35 लाख 88 हजार 239 रुपयांचा अपहार उघडकीस आणला होता. हा अपहार व्यवस्थापिका वासंती निकम यांनी केला असल्याचा आरोप करून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर या प्रकरणाची शासकीय चौकशी सुरु करण्यात आली.
हे अपहार प्रकरण 2016 साली प्रत्यक्षात न्यायप्रविष्ठ झाले व त्याचे कामकाज सुरू झाले. याच प्रमाणे प्राधिकृत चौकशी अधिकारी यांच्याकडूनही चौकशी सुरु करण्यात आली. संस्थेतील कागदपत्रे यांची तपासणी करुन व संचालक तसेच आरोप केलेल्या व्यवस्थापिका यांचे दप्तर व घर यांची तपासणी करण्यात आली.
मिळून आलेले मूळ कागदपत्र यांची तपासणी करून अधिकारी निकालाप्रत पोहोचले. यानुसार याचा निकाल 29 जुलै रोजी देण्यात आला. याची प्रत मंगळवारी सोशलमिडियावर अधिकारी यांनी टाकली. यात हा निकाल संचालकांच्या विरोधात दिला आहे. यात 23 जणांपैकी 15 जणांना दोषी ठरवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button