देवरुखातील विवाहितेचा मृत्यू आकस्मिक नव्हे तर आत्महत्या

देवरूख : शहरातील विवाहितेचा रविवारी झालेला मृत्यू हा आकस्मिक नसून ती आत्महत्या असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अभिजित पवार याच्याविरोधात देवरूख पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित दिलीप पवार (वय-31 रा. मच्छीमार्केट, देवरूख) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नी दीप्ती अभिजित पवार (वय-28) ही नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी गेली होती. घरी येताना ती रस्त्याच्या बाजूला चक्कर येऊन बेशुद्ध पडली. तिला देवरूख ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद  आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली होती.
मात्र पोलिसांना तपासादरम्यान तिच्या राहत्या घरातून एक चिठ्ठी सापडली. यात आपला पती कायम संशय घेतो, मारहाण करतो असे नमूद करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी दिली. दरम्यान, सोमवारी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीनिवास साळोखे यांनी भेट देत या प्रकरणी कसून चौकशीचे आदेश दिले.
यानंतर तिच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली. चौकशीअंती पती अभिजित पवार याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हे. काँ. संतोष सडकर करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button