
परिश्रम करण्याची तयारी असेल तरच तुुम्ही यशाचे शिखर गाठू शकता : जिल्हाधिकारी डॉ. पाटील
राजापूर : शिक्षण हे एक व्रत आहे, या व्रतामध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. हे शिक्षण घेत असताना तुम्हाला कोण व्हायचंय, पुढे काय करायचंय हे आत्ताच निश्चित करा. कारण तुमचे ध्येय निश्चित असेल आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तरच आणि तरच तुुम्ही यशाचे उंच शिखर गाठू शकता, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी येथे केले.
राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘नॉलेज स्क्वेअर’ या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळा व 11 वी विद्यार्थ्यी स्वागत सोहळा कार्यक्रमात डॉ. पाटील बोलत होते. प्रारंभी डॉ. पाटील व मान्यवरांच्या हस्ते ‘नॉलेज स्क्वेअर’ या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर संस्थाध्यक्ष सुलतान ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नवजीवन हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर साबुसिद्दिक कॅप्पस, मुंबई माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष अब्दूल रज्जाक वाघू, संस्थेचे सचिव मजिद पन्हळेकर, प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने, माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे, संस्थेचे माजी अध्यक्ष महामुद मुल्ला, खजिनदार हनिफ युसुफ काझी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, संस्थेचे शाळा समिती अध्यक्ष इरफान ठाकूर आदी उपस्थित होते. या प्रसंगी वास्तुविशारद मारिज ठाकूर, जगदीश ठोसर, महमद रफिक ठाकूर, नुरूल झापडेकर, ठेकेदार हुसैन धारवाडकर यांचा जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रितम सुर्वे, प्रा. व्ही. जी. चिकणीस यांनी केले तर आभार प्रा. जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार दीपाली पंडीत, अबुबक्कर काझी, अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष लियाकत काझी, सौरभ खडपे, स्नेहा कुवेसकर, अश्रफ काझी, सलाम खतीब यांसह संस्था पदाधिकारी, शिक्षणपे्रमी नागरिक उपस्थित होते.