स्वातंत्र्यदिनी एसटी कामगार संघटनेचे आंदोलन
रत्नागिरी : एसटी कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी 15 ऑगस्ट रोजी रत्नागिरी विभागीय कार्यालयाबाहेर महाराष्ट्र कामगार संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन एसटी कामगार संघटनेकडून विभाग नियंत्रक यांना देण्यात आले आहे. कोव्हीड भत्ता लागू असताना इतर विभागांमध्ये भत्ता दिला असतानाही आपल्या विभागात अजूनही देण्यात आलेला नाही, रमजान ईदच्या वेळी विभागामध्ये सण उचल फॉर्म भरुन घेण्यात आले. मात्र आजपर्यंत त्याचा लाभ कर्मचार्यांना भेटलेला नाही, चिपळूणमधील पूरग्रस्त कर्मचार्यांना परिपत्रकीय सूचनांप्रमाणे आर्थिक लाभ मिळणे आवश्यक असतानाही देण्यात आलेला नाही, विभागामध्ये मागील 3 वर्षात विनंती बदली अर्जाची कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशा विविध 9 मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनापूर्वी मागण्या मान्य केल्यास आंदोलन मागे घेण्यात येईल असेही विभागीय एसटी कामगार संघटनेने स्पष्ट केले आहे.