
राजरत्न प्रतिष्ठानतर्फे कोविड लस कॅम्प
रत्नागिरी : राजरत्न प्रतिष्ठानमार्फत नागरिकांसाठी कोव्हिड बुस्टर लस कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. जयेश मंगल पार्क थिबापॅलेस या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात 200 नागरिकांनी लस घेतल्या. यावेळी राजरत्न प्रतिष्ठानचे सभासद आलेल्या प्रत्येक नागरिकाची आस्थेने विचारपूस करून लस देण्याचे नियोजन करत होते. या कॅम्पसाठी राजरत्न प्रतिष्ठान अध्यक्ष रुपेश सावंत, उपाध्यक्ष सतीश राणे, सचिव उमेश देसाई, सहसचिव संदीप तांबे, खजिनदार संतोष सावंत, सहखजिनदार सुनील धनावडे, प्रतिष्ठान सभासद अनिरुद्ध खामकर, महिला सभासद राही सावंत, मनाली राणे, शर्मिली सावंत, अश्विनी राहाटे, जयेश मंगल पार्कचे ओमकार रहाटे यांचे उत्तम सहकार्य लाभले.