संगमेश्वर तालुक्यातील 79 गावे इकोसेन्सिटिव्ह
संगमेश्वर : केंद्रीय पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने जाहीर केलेल्या इको इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये संगमेश्वर तालुक्यातील 79 गावांचा समावेश आहे. केंद्रीय पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने इको इकोसेन्सिटीव्ह संदर्भात अधिसूचना काढली आहे. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार चिपळूण, खेड, लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यातील एकूण 291 गावे इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये आहेत. त्यानुसार या क्षेत्रातील लोकांना बांधकाम, खाण संदर्भातील प्रकल्पांवरही बंदी येणार आहे. त्या शिवाय 20 हजार स्क्वेअर फूटापेक्षा अधिक बांधकामांना मनाई करण्यात येणार आहे. यासंदर्भातील हरकती 60 दिवसात नोंदवणे आवश्यक आहे.
इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी बु., शिरंबे, रातांबी, राजीवली, शिंदे आंबेरी, विकासनगर, आसावे, कासे, कुचांबे, कुटगिरी, पाचांबे, रांगव, आंबेत, मावळंगे, तुरळ, शेनवडे, कोंड भैरव, मासरंग, कातुर्डी कोंड, निवळी, गोळवली, श्रृंगारपूर, तांबेडी, अणदेरी, शेंबवणे, कुंभारखाणी खुर्द, हेदली, धामणी, डिंगणी, नायरी, पिरंदवणे, मांजरे, तिवरे घेराप्रचितगड, असुर्डे, मालदेवाडी, उंबरे, संगमेश्वर, उपळे, कोंड आंबेड, किंजळे, वाशी तर्फ संगमेश्वर, देवळे घेराप्रचितगड, कुळे, कुरधुंडा, फणसवळे, सायले, काटवली, तामनाळे, कुंडी, निगुडवाडी, गोठणे, बेलारी बु. कोंडओझरे, तळवडे तर्फ देवरुख, मठ धामापूर, चांदिवणे, बेलारी खुर्द, बामणोली, सोनारवाडी, मारळ, आग्रेवाडी, करंडेवाडी, हातिव, खडीकोळवण, आंगवली, कोंढ्रण, देवघर, बोंडये, ओझरे बु. निवधे, चाफवली, निनावे, द:खीण, मुर्शी, भडकंबा, भोवडे, किरबेट, देवडे, वाडी आदिष्टी या गावांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त आहे.