
रत्नागिरी नगर परिषदेच्या 8 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी
रत्नागिरी : नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत गुरूवारी काढण्यात आली. यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 8 सदस्य संख्या राखीव झाली आहे. या प्रवर्गातील चार जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी 1, सर्वसाधारण महिलांसाठी 12 जागा आरक्षित झाल्या असून अनारक्षित सदस्य संख्या 11 इतकी आहे.
रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी रत्नागिरी नगर परिषदेच्या सभागृहात एकूण 16 प्रभागातील आरक्षण सोडत काढण्यात आली. भूसंपादन उपजिल्हाधिकारी ऐश्वर्या काळुसे आणि मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढली गेली असून यावेळी माजी नगरसेवक, नगरसेविका, माजी नगराध्यक्ष आणि नागरिक उपस्थित होते. आरक्षण सोडतीतील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या 8 चिठ्ठ्या काढल्या गेल्या. आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्र.1, 2, 4, 6, 12, 14, 15 अ ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे.
प्रभाग क्र.3, 5, 10, 13, 16 अ या जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि प्रभाग क्र. 7, 8, 11 अ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाले आहेत. प्रभाग क्र.9 अ ही जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.
प्रभाग क्र.1, 2, 4, 6, 7, 8, 11, 12, 13, 14, 15 ब जागा सर्वसाधारण आरक्षित असून प्रभाग क्र.3, 5, 9, 10, 16 मधील ब जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नवीन रचनेनुसार 16 प्रभाग झाले असून 32 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.