
रत्नागिरी जिल्ह्यातील वर्षा पर्यटनावर बंदी मुळे पर्यटन व्यवसाय ठप्प
रत्नागिरी जिल्ह्यातील वर्षा पर्यटनावर बंदी घातली जात आहे. शेजारील जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी आमंत्रण दिले जात असताना मात्र फक्त रत्नागिरी जिल्ह्यातीलच वर्षा पर्यटन बंद का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
कोकणचा पावसाळा अनेकांना आवडीचा आहे. अलिकडच्या काही दिवसांत वर्षा पर्यटनासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. सर्वत्र दिसणारी हिरवळ, हिरवीगार झाडे, झोडपणारा पाऊस आणि नदीनाल्यांची खळखळ शिवाय कोसळणारे धबधबे हे अनेकांना आकर्षित करत असतात. हिवाळा आणि उन्हाळ्यात कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षून घेत असतात; मात्र, अलिकडच्या काही दिवसांत पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढती आहे. ,अशाचवेळी प्रशासनाकडून गेली काही वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील वर्षा पर्यटनावर सर्रासपणे बंदी घातली जाते. वर्षा पर्यटनासाठी काही निर्बंध लावणे जरूरीचे असताना सरसकट ठिकाणी बंदीच केली जाते. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. वर्षा पर्यटनातून कोकणात आर्थिक उत्पन्न निर्माण होऊ शकते; मात्र, ते या बंदीमुळे ठप्प होत आहे.
www.konkantoday.com