पाच वर्षापासून फरारी असलेला आरोपी पोलिसांनी पकडला

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील हॉटेल भवानी येथे रविंद्र शिवाजी पाटील ( रा . तामगांव , ता . करवीर , जि. कोल्हापुर) हा रोजंदारीवर कामाला होता. त्याने हॉटेल मालकांकडुन रु .४४,००० / – घेतले आणि घरी महत्वाचे काम आहे असे सांगुन तो निघुन गेला होता .पैसे परत देण्यासाठी वारंवार मागणी केल्यावरही त्याने उध्दट वर्तन केले .

सदरबाबत दि . ०४/०१/२०१७ रोजी संगमेश्वर पोलीस ठाणे येथे कलम ४२० , ५०६ ( २ ) भादसं प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . सदर गुन्हा दाखल झाल्यापासुन यातील वरील आरोपी रविंद्र शिवाजी पाटील याचा शोध घेवुनही तो मिळुन येत नव्हता . पोलीस अधीक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग यांनी पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसही मार्गदर्शन करुन सदर आरोपींना पकडण्याची मोहिम दिली होती .

या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस गोपनिय बातमीदारांकडुन अशी माहिती मिळाली कि , संशयित आरोपी रविंद्र शिवाजी पाटील हा बोलोली , ता . करवीर , जि . कोल्हापुर येथे असल्याचे समजले . त्यानुसार योग्य ती कायदेशीर कार्यवाही पुर्ण करुन , सदर आरोपीस बोलोली येथुन ताब्यात घेण्यात आले आणि संगमेश्वर पोलीस ठाणे येथे वर नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली . त्यास दि . २६/०७/२०२२ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता , त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली . सदरची कामगिरी सपोफौ . प्रशांत बोरकर , पोहवा . शांताराम झोरे , नितीन डोमणे , अरुण चाळके , राजेश आखाडे यांनी केलेली आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button