रत्नागिरीत वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराच्या कानशिलात लगावली आणि त्याच्या कानाचा पडदाच फाटला
रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे वाहतूक पोलिस कर्मचार्याने दुचाकीस्वाराच्या कानशिलात लगावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यात रमेश झाेरे या तरुणाच्या कानाला गंभीर इजा झाली असल्याचे कळते याबाबत तरुणाने संबंधितांकडे तक्रार केली आहे. मंगळवारी हा तरुण दूध व्यवसायासाठी रत्नागिरीत आला होता. त्यावेळी साळवी स्टॉप येथे वाहतूक पोलिसांकडून काही वाहनधारकांवर कारवाई सुरू होती. तेव्हा तेथून जाताना सदर तरुण “कारवाई करू नका”असे म्हणाला. त्याचा राग तेथे कारवाई करत असलेल्या वाहतूक कर्मचार्यांना आला. दुचाकीवरून पुढे गेलेल्या तरूणाचा वाहतूक पोलिस कर्मचार्याने तब्बल दीड कि.मी. पर्यंत पाठलाग केला. त्यानंतर रस्त्यात रमेशला अडवून मारहाण केली. या मारहाणीत तरूणाच्या कानाच्या पडद्याला दुखापत झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे . तो रुग्णालयात गेला असता त्याच्या कानाचा पडदा फाटला असल्याचे सांगण्यात आले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळपर्यंत कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नव्हती.
www.konkantoday.com