
सहा महिन्यांपूर्वी अनंत गिते यांनी मांडलेली भूमिका आम्ही मांडल्यावर आम्ही गद्दार कसे -उदय सामंत यांचा सवाल
महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष शिवसेनेला संपवत आहेत. ही भूमिका सहा महिन्यांपूर्वी शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी मांडली होती. त्यांचीच भूमिका मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी पुढे नेली आहे. आता मात्र भूमिका मांडणारे गद्दार झाले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये माजी अध्यक्ष उदय बने यांच्या वाढदिवसाच्या कौटुंबिक सोहोळ्यात अनंत गीते यांनी आपल्यावर टीका केली ही वस्तुस्थिती आहे. मात्र ज्यांना चार वर्षानी व्यासपीठ मिळाले ते टीकाच करणार, मात्र कोण काय बोलतेय, त्याला आपण किंमत देत नसल्याचा पलटवार आमदार उदय सामंत यांनी केला आहे. रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे ते पत्रकारांशी बोलत होते. आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आम्हाला शिवसेना संपवायची नाही, तर ती बळकट करायची आहे. आम्ही सुरूवातीपासूनच आमची भूमिका स्पष्ट करीत आलो आहोत. www.konkantoday.com




